शेतकरी उन्नतीसाठी शासनाच्या योजना. 🐐🐓🚜🏦Government schemes for Farmers.

0
      Government schemes for Farmers 
          शेतकऱ्यासाठी शासनाच्या योजना,

        आपला देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. शेतकऱ्याला मदत व्हावी म्हणून सरकार शेतकऱ्यासाठी अनेक योजना काढत असत. पण शेतकऱ्यांना त्यांची पूर्णपणे जाणीव नसल्यामुळे ते या योजनांचा लाभ घेत नाहीत. काही योजनांची सविस्तर महिती घेऊ.

    *१) महाडीबिटी - कृषी यांत्रीकिकरण योजना
        
-योजनेचा लाभ:-  
•ट्रॅक्टर साठी १.२५ लाख किंवा १ लाख रुपये.
•इतर अवजारासाठी ५०% किंवा ४०% लाभ योग्य त्या लागू होणाऱ्या योजनेनुसार.
•ठिबक आणि तूषारासाठी ८०% किंवा ७०% मदत यामुळे बाजारातील अतिशय महाग असलेले ठिबक आणि तुषार शेतकरी कमी किमतीत घेऊ शकतात.
•कृषी अवजारे बँक साठी ४०% अनुदान.
•किसान ड्रोनसाठी अर्थसहाय्य म्हणून एकूण किंमतीच्या ४०% ते ५०% आर्थिक मदत शेतकऱ्यास दिली जाते.

-आवश्यक कागदे
•७/१२, ८अ
•बँक पासबुक
•आधारकार्ड
•आधारलिंक असलेला मोबाईल नंबर
•अवजाराचे दरपत्रक
•अवजार टेस्ट रिपोर्ट

- अर्ज कुठ करायचा
 •तालुका कृषी अधिकारी
•कृषी विभाग वेबसाईट
• www.mahadbt.Maharashtra.gov.in

*२) कृषी विभाग - महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना (MREGS)

- योजनेचा लाभ
•१००%अनुदान (३ वर्षात विभागातून)
°फळबाग लागवड (सलग/बांधावर/पडीत जमिनीवर) योजनेत समाविष्ट फळपिके आणि फुलपिके- आंबा, काजू, चिकू, पेरू, डाळिंब, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, नारळ, बोर, सीताफळ, आवळा, चिंच, कवठ, जांभूळ, कोकम, फणस, अंजीर, सुपारी, बांबू, साग, केळी, शेवगा इत्यादी.
°फुलझाडे - गुलाब, मोगरा, निशिगंध, सोनचाफा
•गांडूळ खत निर्मितीसाठी गांडूळ खत युनिट च्या उभारणीसाठी सुद्धा या योजनेअंर्गत लाभ मिळू शकतो.
•नाडेप कंपोस्ट युनिटसाठी सुद्धा या योजनेअंर्गत लाभ मिळतो.
•शेततळे
•मिरी, लवंग, जायफळ, दालचिनी साठी पण मदत होते.

- आवश्यक कागदे
अर्ज 
•७/१२, ८अ
•बँक पासबुक
•आधारकार्ड 
•जॉबकार्ड
•लेबर बजेट प्रमाणपत्र
•अंदाजपत्रक
•ग्रामसभा ठराव

- अर्ज कुठे करायचा
•तालुका कृषी विभागाकडे अर्ज करायचा
•योजना अर्ज व कागदपत्रे ऑफलाईन आणि मंजुरी नंतरची प्रक्रिया ऑनलाइन आहे.

*३) केंद्रपुरस्कृत - प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना (PMFME)

- योजनेचा लाभ
• वैयक्तिक लाभार्थीला भांडवली, गुंतवणुकीकरिता ३५% किंवा कमाल रुपये १० लाखापर्यंत अनुदान.
•भांडवली गुंतवणुक व सामाईक पायाभूत सुविधा, गट लाभार्थी ३५% अनुदान कमाल केंद्र शासनाच्या विहित मर्यादेत लाभ मिळते.
•मार्केटिंग व ब्रॅण्डिंगसाठी ५०% अनुदान कमाल केंद्र शासनाच्या विहित मर्यादेत लाभ मिळते.
• इन्क्युबेशन सेंटर शासकीय अनुदान शासकीय संस्थासाठी १००% तर खाजगी संस्थासाठी ५०% आणि अनुसूचित जाती व जमातीसाठी ६०% अनुदान दिले जाते.
• स्वयंसाहाय्यता गटांतील सदस्यांनी बीज भांडवल रुपये ४०,००० प्रत्येक सदस्यांना प्रशिक्षणासाठी
लाभार्थ्यांना १००% अनुदान दिले जाते.

- आवश्यक कागदपत्रे
•उद्योग नोंदणी प्रमाणपत्र
•पॅनकार्ड
•आधार कार्ड
•प्रकल्प अवहाल
•साहित्य दर पत्रक
•उद्योगाचे मागील तीन वर्षाचे ऑडिट
•कर्ज प्रक्रियेकरीताचे कागदपत्रे 

- अर्ज कुठे करायचा
•तालुका कृषी विभाग
•आत्मा यंत्रणा
•www.pmfme.mpfpi.gov.in

*४) सीमांत शेतकरी गट बांधणी (farmers group) करणे.

- योजनेचा लाभ
•अवजार बँकसाठी ४०% अनुदान
•गोडाऊन बांधकामासाठी मदत
•निविष्ठांची एकत्रित खरेदी (बियाणे, खते, कीटकनाशके, तणनाशके)
•नवीन तंत्रज्ञान, प्रशिक्षण, निविष्ठा, अभ्यास करण्यासाठी फिरणे.
•शेतकरी उत्पादन कंपनी (FPC) स्थापना करण्यास वाव
प्रक्रिया उद्दोगास साहाय्य

- आवश्यक कागदपत्रे
•किमान ११ शेतकरी
•सर्वांचे ७/१२, ८अ किंवा शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र
•सर्वांचे आधारकार्ड
•प्रथम बैठकीचे इतिवृत्त व फोटो
•गटाच्या नावाचा शिक्का 
•१२५० रुपये फिस ( नोंदणी फिस, स्टॅम्प्पपेपर, पुस्तकाची फी)

- अर्ज कुठे करायचा 
•तालुका कृषी विभाग
•तालुका आत्मा यंत्रणा
•कृषी साहाय्यक 


*५) पशुसंवर्धन योजना
- योजनेचा लाभ
•विशेष घटक योजनेअंतर्गत "१०+१ शेळी गट वाटप करणे"( अनुसूचित जाती प्रवर्गासाठी) अनुदान रुपये ७७६५९ दिले जाते
•विशेष घटक योजनेअंतर्गत दुधाळ जनावरांचे गट वाटप करून अनुदान म्हणून रुपये ६३७९६ दिले जातात
•खाद्य वाटप म्हणून १०० % अनुदान दिले जाते.
•५०% अनुदानावर १०० एकदिवसीय पिल्लाच्या गटांचे वाटप केले जाते आणि अनुदान ८००० रुपये दिले जाते.

- आवश्यक कागदपत्रे
•आधारकार्ड व फोटो
•७/१२, ८अ 
•जातीचे प्रमाणपत्र
•रेशनकार्ड •बँक पासबुक झेरॉक्स
•पूर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र

- अर्ज कुठ करायचा
•पंचायत समिती
•जिल्हा परिषद कार्यालय

*६)पीक कर्ज योजना


- योजनेचा लाभ
•तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळते.

-आवश्यक कागदपत्रे 
पीक कर्ज मागणी अर्ज
•फोटो
•केवायसी कागदपत्रे, आधार, पॅनकार्ड
•७/१२,८अ व अभिलेख फेरफार प्रति
•स्वयंघोषणापत्र (पिकपेरा एकाच शेतावर अन्य बँकेकडून पीक कर्ज उचल केली नसलेले पत्र)

- अर्ज कुठे करायचा
कोणतीही राष्ट्रीयकृत बँक
• सहकारी बँक
•सेवा विकास सोसायटी 

*७) मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना
-योजनेचा लाभ
•दिवसा शेतीपंपास विजेची उपलब्धता, दिवसा विनाव्यत्यय अखंडित वीज पुरवठा, वीज बिलापासून मुक्तता, डिझेल पंपाच्या तुलनेत शून्य परिचलन खर्च.

- आवश्यक कागदपत्रे
•ए -१ फॉर्मवर संपूर्ण महिती भरावी सोबत ७/१२ उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक आणि सामाईक क्षेत्र असल्यास ना हरकत प्रमाणपत्र याची प्रत अपलोड करावी.

- अर्ज कुठे करायचा 
•महावितरण वेब पोर्टलवर
https://www.mahadiscom.in/solar

°शेतकऱ्यांना मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना.

- लाभार्थी पात्रता

•अर्जदार शेतकऱ्याकडे स्वताच्या नावावर कमीत कमी ०.६० हेक्टर इतके क्षेत्र असणे खूप गरजेचे आहे.
• अर्जदार शेतकऱ्याची जमीन शेततळे खोदण्यास योग्य असणे खूप आवश्यक आहे.
• अर्जदार शेतकऱ्याने यापूर्वी या योजनेचा लाभ घेतला नाही पाहिजे. किंवा इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेऊन शेतात शेततळे खोदण्यासाठी शासनाची मदत घेतलेली नसावी.
        मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजने अंतर्गत शेतकऱ्याला शेततळे खोदण्यासाठी 75000 इतकी रक्कम मदत म्हणून दिली जाईल.


 मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना. यासाठी अर्ज कुठे करायचा

   http:/mahadbtmahit.gov.in या वेबसाईटवर जाऊन आपण ऑनलाइन अर्ज करु शकतो.

 



एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)