फुले किमया KDS 753 माहिती आणि नियोजन. (KDN 753 soybean information and management)

1

           फुले किमया KDS 753 माहिती. KDN 753 soybean information.

      फुले किमया (kds 753) हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि कृषी संशोधन केंद्र डिग्रस यांनी २०१७ साली संशोधित केलेले सोयाबीनचे जास्त उत्पन्न देणारे वाण आहे.

फुले किमया हि सोयाबिन ची जात तांबेरा रोगास प्रतिकार्यरक्षम आहे.या जातीचे पेरणीचे एकरी प्रमाण २५ kg इतके आहे. फुले किमया ही ९५ ते १०० दिवसात येणारी सोयाबीनची जात आहे.या सोयाबीनच्या पेरणीसाठी मध्यम काळी आणि चांगला निचरा होणाऱ्या जमिनीची शिफारस केली आहे.
      महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी सर्वांच्या परिचयास आणलेल्या kds 753 म्हणजेच फुले किमया या सोयाबीनची पेरणी जून महिन्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करावी. हे सोयाबिन kds 726 म्हणजेच फुले संगम या सोयाबीनच्या जातीपेक्षा लवकर येत असते.
        kds 753 म्हणजेच फुले किमया या सोयाबीनची पेरणी ही लागवड पद्धतीने बेड तयार करून लागवड करावी. यामध्ये दोन बेड मधील अंतर 2 फूट ठेवावे आणि एका बेडवर दोन तास लावावेत. बेडवरील तासाचे अंतर 18 ते 20 cm असावे. अश्या पद्धतीने लागवड केल्यास एका एकर मध्ये 15kg इतके सोयाबिन चे बियाणे लागते. आणि फुले किमया या सोयाबीनचे बियाणे बाजारात इतर सोयाबीनच्या जातीच्या तुलनेत स्वस्त दरात उपलब्ध आहे.
            फुले किमया या सोयाबीनची उंची जास्त असली तरी या सोयाबीनचे उत्पादन चांगले होते. सिंगल झाडाला 200 शेंगा लागतात तर एकाच ठिकाणी 2 ते 3 झाड असेल तर 400 ते 450 इतक्या शेंगा तिथे लागतात. योग्य तण आणि आळी व्यवस्थापन केले तर अधिक चांगले उत्पन्न होते.फुले किमया या सोयाबीनचे एका एकर मध्ये 12 ते 15 क्विंटल उत्पन्न होऊ शकते.
          फुले किमया kds 753 हे सोयाबिन मध्यम कालावधीत येत असल्याने या सोयाबीनची लागवड मध्यम भारी जमिनीत करावी. जमीन अधिक चांगली असेल तर आणखी चांगले होईल पण मध्यम भारी जमिनीसाठी फुले किमया हे सोयाबिन अतिशय योग्य पर्याय आहे. 
         फुले किमया हे सोयाबिन खोड आळी आणि yellow mosaic या रोगास प्रतिकार्यक्षम आहे. फुले किमया हे सोयाबिन वरील दोन रोगास इतर सोयाबीनच्या जातीच्या तुलनेत अधिक प्रतिकार्यक्षम आहे.
       सोयाबीनचे अधीक चांगले उत्पन्न घेण्यासाठी सोयाबीनच्या जातीच्या तुलनेत सोयाबीनचे योग्य नियोजन करणे खूप गरजेचे आहे. म्हणून फुले किमया ही सोयाबिनची जात चांगली तर आहेच पण त्याचबरोबर योग्य नियोजन केले तर अधिक चांगले उत्पन्न होते. सोयाबीनची लागवड करताना योग्य औषधाची बीजप्रक्रिया करावी. आणि नंतर आळी आणि बुरशीचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
         फुले किमया हे सोयाबिन लवकर येत असते म्हणून हे सोयाबिन काढणीला आले असता जास्त वेळ वाया न घालविता लगेच कापणीला सुरवात करावी.

पेरणी नियोजन.

बेड पद्धतीने लागवड करत असताना दोन बेड मधील अंतर 2 फूट ठेवावे आणि एका बेडवर दोन तास लावावेत. बेडवरील तासाचे अंतर 18 ते 20 cm असावे. अश्या पद्धतीने लागवड केल्यास एका एकर मध्ये 15kg इतके सोयाबिन चे बियाणे लागते. आणि पारंपरिक पद्धतीने लागवड करत असताना फुले किमया या जातीचे पेरणी नियोजन करताना जमिनीची आधी चांगली नांगरणी आणि वखरणी करून मशागत करणे गरजेचे आहे. या वाणाचे एकरी २५ किलोग्राम चे प्रमाण आहे. पेरणी करत असताना दोन्ही तासामधील अंतर २२ इंच तर दोन्ही झाडामध्ये ५ ते ६ इंच अंतर ठेवावे.

*तण नियोजन.

फुले किमया या वाणामधील तण नियंत्रण करणे खूप गरजेचे आहे. पेरणी नंतर लगेच किंवा ४८ तासाच्या आत DOW कंपनीचे Strongarm एकरी १२.४ gm फवारावे किंवा सारखे घटक असलेले कोणते पण तणनाशक फवारावे. हे तणनाशक ३० दिवस काम करत असते.  ३० दिवसानंतर कोळपणी करून घ्यावी. जास्त उशिरा कोळपणी करू नये कारण ३० दिवसानंतर सोयाबिन मध्ये पांढऱ्या मुळांची वाढ होत असते.नंतर सोयाबीनची वाढ होते आणि खालचे तण वर येत नाही म्हणून मागून उगवलेले तण पिकाचे नुकसान करत नाही.

*खत नियोजन

पेरणीपूर्वी भारीची जमीन असेल तर सिंगल सुपर फॉस्फेट २ पोते आणि हलकी जमीन असेल तर सिंगल सुपर फॉस्फेट ३ पोते टाकावे. आणि पेरणी करत असताना २०:२०:०:१३ किंवा १०:२६:२६ सोबत टाकावे. आपल्या जमिनीत शेणखत असेल तर सिंगल सुपर फॉस्फेट एक पोत टाकले तरी चालते.

*फुले किमया फवारणी नियोजन

फुले किमया या सोयाबीनचे आळीचे आणि बुरशीचे योग्य असे नियंत्रण करणे गरजेचे आहे. त्यासाठी सोयाबिन योग्य त्या कालावधीत योग्य त्याच  औषधि ची फवारणी करणे गरजेचे आहे.

-पहिली फवारणी:-१३ ते २५ दिवसाच्या दरम्यान पहिली फवारणी घ्यावी. यामध्ये प्रोफेक्स सूपर किंवा अलिका हे कीटकनाशक, साफ किंवा रोको हे बुरशीनाशक आणि १९:१९:१९ हे खत वापरावे.

- दुसरी फवारणी:-४० दिसला दुसरी फवारणी करावी. दुसऱ्या फवारणीसाठी बॅराझाईड(adama) किंवा इविसेंट (sygenta) हे कीटकनाशक, साफ किंवा रोको हे बुरशीनाशक आणि १२:६१:०० हे खत व एखादे टॉनिक वापरले तरी चालेल.

-तिसरी फवारणी:- ही आपली शेवटची फवारणी असेल. ६६ दिवसांनी हि फवारणी घ्यावी. यामध्ये एमामेक्टिन बेंझोएट  (emamectin benzoate ) आणि क्लोरोसायापर मिथेन  (chlorocyper mythen) हे कीटकनाशक, कस्टोडिया (adama) हे बुरशीनाशक आणि ००:५२:३४ हे खत वापरावे.


*टीप:- मार्केट मध्ये सारखे घटक असलेले कोणते पण कीटकनाशक, बुरशीनाशक वापरले तरी चालेल.




एक टिप्पणी भेजें

1टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें