Papaya Crop information
पपई हे पिक फळबाग या मधील अतिशय चांगल्या प्रकारे उत्पन्न देणारे पिक आहे. पपई पिक हे आपल्या महाराष्ट्रात खूप मोठ्या क्षेत्रात घेतले जाते. हे पिक प्रामुख्याने धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर, अमरावती, पुणे, जालना या जिल्ह्यात घेतले जाते. तसे संपूर्ण महाराष्ट्राचेच हवामान पपई या पिकासाठी अनुकूल आहे म्हणून पपई हे पिक संपूर्ण महाराष्ट्रातच घेतली जाते. पपई या पिकाचे खत नियोजन, किट आणि रोग नियंत्रण करणे खूप गरजेचे असते. आणि त्याची संपूर्ण महिती शेतकऱ्यांना असणे फार आवश्यक आहे.
*पपई पिकासाठी लागणारे हवामान:-
पपई हे पिक उष्ण आणि दमट हवामानात चांगल्या प्रकारे येणारे पिक आहे. पपई हे पिक इतर पिकाच्या तुलनेत हवामानाचा जास्त परिणाम होणारे आहे. त्यामुळे हवामानाचा या पिकावर खुप जास्त परिणाम होतो. तापमान जर कमी असेल तर फळ परिपक्व होण्याचा कालावधी खुप वाढतो आणि फळाची वाढ चांगल्या प्रकारे होत नाही. आणि झाडाला फळांची संख्या पण कमी लागते. या पिकास जास्त जोराचा पाऊस आणि थंड वातावरण सहन होत नाही. तसे तर पपई हे पिक आपण वर्षभर पण घेऊ शकतो पण हवामाचा परिणाम लक्षात घेऊन पपई पिक जास्तीत जास्त जून ते ऑक्टबर या महिन्यात घेतले जाते.
*पपई पिकाची लागवड:-
पपई हे पिक घेण्यासाठी पपई या पिकाचे रोप लावावे लागते. आधी पपईच्या बियांपासून रोप तयार करावे लागते आणि नंतर ते रोप जमिनीत लावावे लागते. आपल्याला रोप तयार करण्यासाठी एक एकर साठी पपईच्या बियाचे चांगल्या जातीचे २ ते ३ पॅकेट आणावे लागतील. हे एक पॅकेट १० ग्राम चे असते आणि एका पॅकेट मध्ये ६०० बिया असतात. या बीयाचे चांगल्या योग्य पद्धतीने रोप तयार करावे लागते.तसे बाजारामध्ये पपई पिकाचे रोप पण विकत मिळते. आणि यासाठी आपण जवळील रोप वाटीकाची मदत घेऊ शकतो. हे रोप दीड ते दोन महिन्याचे झाल्यावर लावण्या योग्य होते.
आपले शेत पपई लागवडीसाठी तयार करत असताना जमिनीची आधी नांगरणी करावी. नंतर चांगले रोटर मारून सर्व जमीन समान करून घ्यावी. पपई पिकाची लागवड करत असताना दोन्ही तासामधले अंतर ८ फूट तर दोन्ही झाडामधले अंतर ६ फूट असणे खुप गरजेचे आहे. आशा पद्धतीने आपण लागवड केल्यास एका एकर मध्ये आपले ९३० रोपे बसतील.
*पपई पिक किट आणि रोग महिती:-🐛🪲
पपई या पिकावर खुप लवकर किडे, अळ्या आणि रोग येत असतात. म्हणून सर्व प्रकारच्या रोगाचे आणि आळीचे नियंत्रण योग्य वेळेत केले तर ते आपल्या पिकाचे जास्त नुकसान करणार नाहीत.
-१) कोळी:-
कोळी हा किडा पपई या पिकामध्ये खुप ञास देत असतो. हा किडा पपई पिकाच्या पानाच्या खालच्या बाजूला येत असतो. या किड्याचे जास्त प्रादुर्भाव वाढल्यास पपईचे पण सुखते आणि वाळून जाते.या किड्याच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट (dimethoate) ५०० मिली किंवा डायकोफॉल (dicofol) १ लिटर हे प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळून एका हेक्टर मध्ये फवारावे.
-२) मावा आणि पांढरी माशी:-
पांढरी माशी आणि मावा हे पिकातील रसाशोषण करणारे किडे आहेत. या किड्याचे वेळेत नियंत्रण नाही केले तर हे किडे आपल्या पपई पिकाचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकतात. या किडीच्या नियंत्रणासाठी मिथीलडीमेटॉन ( methyl demeton) हे प्रति १० लिटर पाण्यासाठी १० मिली वापरावे.
-३) केवडा (papaya):-
या रोगामध्ये फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे झाडाची अवस्था होत असते. पानावर ठिपके येणे, पाने वेडीवाकडी होणे ही या रोगाची लक्षणे असतात. हा रोग आपल्या शेतात दिसून आल्यास अधी सर्व रोगीट झाडे उपटून शेताच्या बाहेर टाकावी. आणि दर १५ दिवसांनी २०० मिली डायमेथोएट (dimethoate) किंवा मेटॅसिटॉक्स (metasystox)
१०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
-४) बुंदा सडणे:-
या रोगाची लक्षणे म्हणजे यामुळे पिकाचा बुंदा हा जमिनीत सडून जातो आणि झाड पूर्णपणे वाळून जाते. हा रोग जास्त ओलसर आणि पाणी जास्त असणाऱ्या जमिनीत येत असतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी ०.२% कॉपर ऑक्सीक्लोराईड (copper oxychloride) याचे द्रावण करून प्रत्येक झाडास १ लिटर टाकावे.
-५) करपा:-
फळावर ठिपके येणे, झाडाच्या खोडावर ठिपके येणे ही या रोगाची लक्षणे असतात. जास्त सूर्यकिरण लागल्यामुळे हा रोग होत असतो. यासाठी आपली फळे तपकिरी कागदाने झाकावी. आणि मॅन्कोझेब(mencozeb) २० ग्राम हे प्रत्येकी १० लिटर पाण्यासाठी वापरावे.
-५) भुरी:-
पावसाळ्यात दमट आणि आद्र हवामानामुळे हा रोग पपई पिकावर येत असतो. या रोगामुळे पपई पिकाचे पाने आणि फुले खुप जास्त गळतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी दर १५ दिवसांनी गंधकाची फवारणी करावी.
*पपई पिकाचे खत नियोजन:-
पपई पिकाचे खत नियोजन हे आपल्या जमिनीच्या मातीवर अवलंबून असते. म्हणून शक्यतो आपल्या जमिनीतील मातीचे परीक्षण करून आपल्या मातीतील घटकांची माहिती करून घ्यावी यामुळे आपण आपल्या शेतातील सर्वच पिकाचे खत नियोजन अधिक चांगले करू शकतो.
पपई लागवडीपूर्वी शेतात चांगले कुजलेले ४ ते ५ टन शेणखत टाकावे. आणि भेसळ डोस मध्ये एका झाडासाठी १०० ग्राम युरीया, १०० ग्राम DAP आणि ८० ग्राम मिरीटॉप पोटॅश द्यावे आणि हाच भेसळ डोस लागवडीपासून ३,५ आणि ७ महिन्यांनी द्यावा.