हळद पीक किटक आणि रोग माहिती आणि हळद बेणेप्रक्रिया Turmeric diseases and insects information and solution and Turmeric Seed Treatment. हळद खत नियोजन (turmeric pest management)

0

   हळद पीक किटक आणि रोग माहिती. आणि हळद बेणेप्रक्रिया             Turmeric diseases and insects information and solution.


        हळद हे पीक शेतकऱ्यांना जास्त फायदा मिळून देणारे हमिचे पीक आहे. आणि महाराष्ट्रातील जमीन आणि हवामान हळद या पिकास पूरक आहे म्हणून हळदीच्या लागवडीचे क्षेत्र दिवसेंदिवस खूप वाढत आहे.
    हळद पिकावर येणारे कीटक आणि रोग याची माहिती घेऊ.
*कंदमाशी :-
        कंदमाशी ही हळद पिकावरील नुकसान करणारी प्रमुख कीड आहे. कंदमाशीचा प्रौढ डासासारखा परंतु मुंगळ्याप्रमाणे आकाराने मोठा व काळसर रंगाचा असतो. माशीचे पाय शरीरापेक्षा लांब असतात. पायांची पुढील टोके पांढऱ्या रंगाची असतात. हि कंद विकसित झाल्यावर अंडे घालतात. नंतर याच अळ्या तयार होऊन कंद खाण्यास सुरुवात करतात.कंदमाशीच्या नियंत्रणासाठी syngenta कंपनीचे अम्पलिगो, अलीका किंवा इतर कोणते पण भारिचे कीटकनाशक मारावे. यासाठी आणखी एक उपाय म्हणजे एरंडा ( crastal) २०० gm घ्यायचे. आणि ते बारीक करून एक एकर मध्ये ६ ते ७ ठिकाणी पाण्यात ठकून ठेवायचे. नंतर ६ ते ७ दिवसांनी याचा उग्रवास सुटतो आणि प्रौढ कंदमाशी यात येऊन पडते. आणि पूर्णपणे थांबली जाते.

*ह्युमनी  आळी            ह्युमनी  आळी ही शेणखताच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होणारी आळी आहे.ज्या शेतामध्ये शेणखताचा जास्त वापर केला जातो त्या शेतामध्ये ही आळी होत असते. अर्धवट कुजलेले शेणखत शेतात टाकल्यामुळे या अळीचा प्रादुर्भाव जास्त वाढत असतो.ह्युमनी आळी
च्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरिफोस ५०% वापरावे.

*नेमैटोड किंवा सुत्रकर्मी 

    या मध्ये हळदीच्या मुळांचे ब्लॉकेज होत असते. आणि काही दिवसातच हळदीचे झाड वाळायला सुरू होते. आणि याचा परिणाम झाल्यामुळे हळदीचे एकरी उत्पनात खूप घट होते. यासाठी उपाय म्हणजेच हळद पिकामध्ये ठीक ठिकाणी झेंडू या फुलाचे झाले लावावे.

* पाने खाणारी किंवा गुंडळणारी आळी
           हळदीच्या पिकाला अळीचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पाने खाणारी किंवा गुंडळणारी आळी वारंवार येत असते याला उपाय म्हणजे syengenta कंपनीचे आलिका, अम्प्लिगो, एविसेंट किँवा बायार कंपनीचे सोलोमन हे कीटकनाशक फवारावे.

*कंदकुज 

    यामध्ये हळद पिकाचे कंद नासले जातात. त्यामुळे कंद खराब होत असतात. आणि सर्वात जास्त हा रोग नुकसान देणारा आहे. यामुळे हळदीचे झाड पूर्न्हता खराब होते. आणि माल पण लागत नाही. यासाठी उपाय म्हणजे कॉपर क्लोराईड आणि प्रोफेनो मिथायील हे आहेत.

*करपा
       करपा हा रोग हळद पिकाच्या पानावर येतो. यामध्ये पानावर गोल ठिपके येतात. आणि पान वाळून जात असतात. यासाठी उपाय म्हणजे कार्बेन्डाझिम (carbendazim), मेनकजेब (mancozeb), अझोक्सीस्ट्रोबिन ( azoxystronobin), टेबुकोनाझोल (tebuconazol), pyraclostrobinआणि सोबत अँटिबायोटिक म्हणून स्त्रेप्टो सायकलिंग.


* हळद खत नियोजन (turmeric pest management)


      हळद या पिकाला खत नियोजनाची खूप गरज असते. आणि इतर पिकापेक्षा या पिकाला खताचे प्रमाण पण जास्त लागते. हळदीच्या लागवडीपूर्वी भेसळ डोस देणे गरजेचे असते त्यामधे आपण DAP, पोटॅश, सिंगल सुपर फॉस्फेट, लिंबोळी आणि सूक्ष्मअन्नद्रव्य युक्त खत वापरावे. या खतामध्ये आपल्या जमिनीच्या गरजेनुसार बदल करू शकता. पण water soluble खत देणे अनिवार्य आहे. त्याशिवाय उत्पन्न चांगले होत नाही. वॉटर सोलूबल खताचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यामधे
     १)१९:१९:१९: - 
       हळद लागवडीपासून ३० ते ६० दिवसाच्या या कालावधीत हळदीला १९:१९:१९ हे खत ड्रिप द्वारे सोडणे खूप गरजेचे आहे. हे खत हळदीची पाने मोठे आणि मजबूत बनवते आणि झपाट्याने वाढ होण्यास मदत करते. हे खत सोडत असताना पाच दिवसाच्या अंतराने ५ kg सोडावे असे २५ kg ३० ते ६० दिवसात सोडावे. आणि एकदा क्लोरोपयरिफोस५०% सोडावे यामुळे पिकाला असलेली कीड मरते.

२)१२:६१:०० :- 
        हळद लागवडीपासून ६० ते ९० दिवसांच्या कालाधीत हळदीला १२:६१:०० हे खत सोडले पाहिजे. कारण या कालावधीत हळदीला फुटवे निघण्यास प्रारंभ झाला असतो. म्हणून फुटव्यांची संख्या वाढविण्यासाठी हे खत सोडणे खूप गरजेचे आहे. यामध्ये फॉस्फरस चे प्रमाण अधिक असते जे फुटवे वाढिण्याकरिता काम करते.हे खत सोडत असताना पाच दिवसाच्या अंतराने ५ kg सोडावे असे २५ kg ६० ते ९० दिवसात सोडावे. आणि सोबत एकदा ह्युमिक ॲसिड ची डीलचींग करावी.

   ३)१३:४०:१३:-
        हळद लागवडीपासून ९० ते १२० दिवसांच्या कालाधीत हळदीला १३:४०:१३ हे खत सोडले पाहिजे.हे खत सोडत असताना पाच दिवसाच्या अंतराने ५ kg सोडावे असे २५ kg ९० ते १२० दिवसात सोडावे. हे खत हळदीची मजबुती वाढवण्यास मदत करते. सोबत एकदा झिंक आणि फेरस ड्रीप द्वारे सोडवे.

     ४)००:५२:३४:-
     हळद लागवडीपासून १२० ते १५० दिवसांच्या कालाधीत हळदीला ००:५२:३४ हे खत सोडले पाहिजे. कंदाचा आकार वाढवणे हे या खताचे मुख्य काम असते. कारण या कालावधीत हळदीला माल लागण्यास सुरुवात झालेली असते.हे खत सोडत असताना पाच दिवसाच्या अंतराने ५ kg सोडावे असे २५ kg १२० ते १५० दिवसात सोडावे. आणि सोबत एकदा बोरॉन सोडावे.

   ५)००:००:५०:-
       हळद लागवडीपासून १५०ते १८० दिवसांच्या कालाधीत हळदीला ००:००:५० हे खत सोडले पाहिजे. शेंगचा आकार वाढविण्यासाठी हे खत सोडणे खूप गरजेचे असते.हे खत सोडत असताना पाच दिवसाच्या अंतराने ५ kg सोडावे असे २५ kg १५० ते १८० दिवसात सोडावे.

Turmeric Seed Treatment

हळद बेणेप्रक्रिया

    भारतात हळद पिकवण्याच्या बाबतीत महाराष्ट्राचा सहावा क्रमांक आहे. हळदीचे हमी पीक असल्यामुळे शेतकरी हळदीची लागवड मोठ्या प्रमाणात करत आहेत. हळदीचे बुरशी आणि कीड यापासून संरक्षण करण्यासाठी हळद लागवड करताना एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक यांची संयुक्त बीजप्रक्रिया करणे खूप गरजेचे आहे. हळद बीजप्रक्रिया करण्यासाठी काही औषधी पुढीप्रमाणे आहेत.

*१) क्लोरोपायरिफॉस २०%(chlorpyriphos 20%)

आणि बाविस्टिन - क्रिस्टल (bavistin- crystal)

हळद बीजप्रक्रिया करण्यासाठी एका बुरशीनाशकाची आणि एका कीटकनाशकाची आवश्यकता असते. येथील क्लोरोपायरिफॉस २०% हे कीटकनाशक आणि बाविस्टिन हे बुरशीनाशक आहे. बाविस्टिन मध्ये कार्बेन्डाझिन ५०% (carbendazin 50%) असते. बाविस्टिन हे क्रिस्टल (crystal) कंपनीचे आहे. हळद बेणे प्रक्रिया करण्यासाठीक्लोरोपायरिफॉस २०% २०० ml आणि बाविस्टिन २००gm हे एका एकर साठी वापरावे.

*२) साफ (Saaf - upl) आणि क्विनालफॉस (Quinalphos25%)

या दोन्हीपैकी साफ हे बुरशीनाशक तर क्विनालफॉस२५%(Quinalphos25%) हे कीटकनाशक आहे. साफ हे upl कंपनीचे बुरशीनाशक आहे. यामध्ये कार्बेन्डाझिन१२%(carbendazin12%) व मंकोझेब ६३%(mancozeb 63%) आहे. या दोन्हींचे चांगले संयुक्त मिश्रण करून हळदीला कमीत कमी अर्धा तास पाण्यात भिजून ठेवणे गरजेचे आहे.

*३)क्विनालफॉस(Quinalphos25%) आणि M45


        
क्विनालफॉस२५%(Quinalphos25%) हे कीटकनाशक आहे. तर M45 हे बुरशीनाशक आहे.
M45 मध्ये मंकोझेब७५%(mancozeb75%) असते. हे उत्तम बुरशीनाशक म्हणून काम करते. कंदसड नियंत्रणासाठी खूप चांगले औषिध आहेत.


एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)