कापुस पिकावरील रोग माहिती आणि उपाय. Cotton crop diseases information and management.
Diseases of cotton crop.
Best insecticides on cotton crop.
कापूस पिकावरील कीड नियंत्रण.
*१) बुरशी जन्य करपा (Alternariya leaf spot)on cotton crop
हा रोग कापूस cotton crop लागवडीपासून ते शेवटपर्यंत होत असतो. हा रोग पहिल्या पिकाचे अवशेष रानात असतील तर येत असतो. पहिल्या पिकाचे अवशेष असल्यामुळे या बुरशीचा परिणाम कापूस पिकांवर दिसून येत असतो. तसेच हा रोग पोटॅशियम च्या कमतरतेमुळे सुद्धा होत असत. कापूस पिकामध्ये जेव्हा पोटॅशियम ची कमतरता निर्माण होते तेव्हा वरील फोटोमध्ये दाखविल्याप्रमाणे पानावर ठिपके दिसू लागतात.
या रोगाची लक्षणे अनेक आहेत.या रोगामुळे पानावर एकात एक वर्तुळ येतात. फिकट गुलाबी रंगाच्या ठीपक्याने कापसाचे पान वाळून जात असते. नंतर हाच ठिपका मध्यभागी राखाडी रंगाचा होत असतो.आणि बाजूने जांभळा रिंग दिसतो.या रोगामुळे कापूस पिकाची पानगळ होत असते म्हणून या रोगाचे व्यवस्थापन करणे खुप गरजेचे आहे.
*उपाय:-
•कार्बोक्सीन (carboxin) 37.5% + थायरम (Thiram)37.5% याची बीजप्रक्रिया करावी. हे घटक असलेले औषध धानुका कंपनीचे विटामॅक्स पॉवर (vitamax power) हे आहे.हे ३ ग्राम प्रत्येकी १ kg साठी वापरावे.
आणि फवारणी साठी खालील पैकी एक बुरशीनाशक वापरावे.
•प्रोपिनेब (propineb)70%WP हे घटक बायर(bayer) कंपनीच्या अंट्रॅकॉल (Antracol) यामध्ये आहे. आहे याचे वापरण्याचे प्रमाण 2.5 ग्राम प्रति 1 लिटर पाण्यासाठी आहे.
•प्रोपिकोनाझोल(propiconazole) 25%EC हा घटक क्रिस्टल (Crystal) कंपनीच्या तील्ट (Tilt) यामध्ये आहे. आणि या औषधांचे वापरण्याचे प्रमाण 1ml प्रति 1 लिटर पाण्यासाठी आहे.
•पायराक्लोस्ट्रोबिन (pyraclostrobin) 20%WG हे 1लिटर पाण्यासाठी 1gm वापरावे.
•अझॉक्सीस्ट्रोबिन(Azoxystrobin) 18.2% + डायफेनोकोनाझोल (Difenoconazol) 11.4%SC हे घटक सिजेंटा (syngenta) कंपनीच्या अमिस्टर (Amistar) आणि धनुका (Dhanuka) कंपनीच्या गोडीवा सुपर (Godiwa super) या औषधांमध्ये आहेत. आणि याचे वापरण्याचे प्रमाण 1ml प्रति
1लिटर पाण्यासाठी आहे.
•मेटिरम (Metiram) 55% + पायराक्लोस्ट्रोबिन (pyraclostrobin) 5% WG हे घटक BASF या कंपनीच्या कॅब्राओ टॉप (Cabrio top) यामध्ये आहे. आणि या औषधाचे वापरण्याचे प्रमाण 1 gm प्रति 1 लिटर पाण्यासाठी आहे.
• फ्लुक्सापायरॉक्साड (Fluxapyroxad)167 gm + पायराक्लोस्ट्रोबिन (pyraclostrobin) 333gm
हे घटक BASF कंपनीच्या मेरिवोन (merivon) या औषधामध्ये आहेत. आणि याचे वापरण्याचे प्रमाण 0.6 gm प्रति 1 लिटर पाण्यासाठी आहे.
*२) जिवाणू जन्य रोग (Xanthomonas oxanopodis) on cotton crop
हा रोग सतत पडणाऱ्या पावसामुळे येतो. पाण्याचे प्रमाण जास्त झाल्यास फोटोमध्ये दाखविल्याप्रमाणे कापसाची पाने होत असतात.पावसाचा पडणारा थेंब एका पानावर पडून दुसऱ्या पानावर पडला की या रोगाचा प्रसार होत असतो. असे झाल्यामुळे हा रोग खुप झपाट्याने पसरत असतो. हा रोग पानाच्या शिरात अडकलेला दिसत असतो. या रोगामध्ये देठावर लंब गोल येतो आणि कालांतराने देठ करपून जात असते. परिणामी झाडाची फांदीच करपून जाते. आणि बोंडावर काळसर खोलगट ठिपका येतो आणि वाढत असतो परिणामी ते बोंड उमलतच नाही. यामुळे कापसाचे खुप नुकसान होते.
-उपाय:-
•कार्बोक्सीन (carboxin) 37.5% + थायरम (Thiram)37.5% याची बीजप्रक्रिया करावी. हे घटक असलेले औषध धानुका कंपनीचे विटामॅक्स पॉवर (vitamax power) हे आहे.हे ३ ग्राम प्रत्येकी १ kg साठी वापरावे.
आणि फवारणीसाठी
•कॉपर ऑक्सीक्लोराईड (copper oxychloride) 50% WP हा घटक ब्लू कॉपर (blue copper) या औषधामध्ये आहे. हे 25 gm आणि स्ट्रेप्टोसायक्लीन (streptocyclin) 2gm हे प्रति 10 लिटर पाण्यासाठी वापरायचे आहे.
*३) दहिया रोग ( Ramularia areola) on cotton crop
या रोगामध्ये फोटोवर दाखविल्याप्रमाणे पानावर पांढरी बुरशी दिसत असते. बुरशी येण्याची सुरुवात पानाच्या खालच्या बाजूने होत असते. या बुरशीच्या परिणामामुळे कापसाची पानगळ आणि फुलगळ खुप जास्त प्रमाणात होत असते. ही बुरशी पानावर दही शिपडल्यासारखी दिसत असते. जर कापूस पिकास नत्राचा जास्त वापर केला तर कायिक वाढ होते त्यामुळे दाहिया रोग येतो आणि खुप झपाट्याने प्रसारित होत असतो.ज्या पानापर्यंत सूर्यप्रकाश जात नाही तेथे आद्रता वाढून दहीया चा प्रादुर्भाव खुप जास्त असतो.
- उपाय:-
•अझॉक्सीस्ट्रोबिन(Azoxystrobin) 18.2% + डायफेनोकोनाझोल (Difenoconazol) 11.4%SC हे घटक सिजेंटा (syngenta) कंपनीच्या अमिस्टर (Amistar) आणि धनुका (Dhanuka) कंपनीच्या गोडीवा सुपर (Godiwa super) या औषधांमध्ये आहेत. आणि याचे वापरण्याचे प्रमाण 1ml प्रति
1 लिटर पाण्यासाठी आहे.
•क्रेसॉक्सीम मिथाइल् (kresoxim methyl) 44.3%
हे घटक परिजात (parijat) या कंपनीच्या एलोन (Elon) या औषधामध्ये आहे. आणि याचे वापरण्याचे प्रमाण 1ml प्रति 1लिटर साठी आहे.
4) बोंड सड (रॉड)
बोंडावर तेलकट, काळपट ठिपके पडतात.
एकात्मिक रोग व्यवस्थापन
1) रोगप्रतिकारक जातींची लागवड करावी.
2) प्रति किलो बियाण्यास 1 ग्रॅम कार्बोक्सिन अधिक 3 ग्रॅम थायरमची प्रक्रिया करावी.
3) पेरणीसाठी तंतुविरहित केलेले बियाणे वापरावे.
4) शेतात आंतरपीक किंवा मिश्र पिके घ्यावीत.
5) रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन स्ट्रेप्टोमायसीन (100 पीपीएम) 1 ग्रॅम अधिक कॉपर ऑक्झिक्लोराइड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
6) गरजेनुसार 10 दिवसांच्या अंतराने पुन्हा फवारणी घ्यावी.
5)कापूस पिकावर येणारी बुरशी
Cotton crop fungi management
a)अल्टरनेरियाचे ठिपके
रोगकारक बुरशी - अल्टरनेरिया मॅक्रोस्पोरा
alternaria macrospora
लक्षणे
1) पानावर प्रथम लहान तपकिरी किंवा काळपट रंगाचे गोल ठिपके दिसतात. कालांतराने ठिपके मोठे होऊन आकारविरहित होतात.
2) ठिपक्यांचा मध्य भाग भुरकट रंगाचा होऊन त्यात भेगा पडतात, पाने वाळून गळून पडतात.
b)सरकोस्पोराचे ठिपके
रोगकारक बुरशी - सरकोस्पोरा गॉसीपीना cercospora gossypina
लक्षणे -
1) cotton crop च्या पानावर गोल फिक्कट तपकिरी रंगाचे लहान ठिपके दिसतात.
2) सुरवातीस खालच्या पानांवर आणि त्यानंतर वरच्या पानांवर ठिपके पडतात. पुढे भुरकट रंगाचे होतात. ठिपके एकमेकांत मिसळून आकारविरहित होतात. अशी पाने गळून पडतात.
C)मायरोथेशियमचे ठिपके
रोगकारक बुरशी - मायरोथेशियम रोरीडम myrothecium roridum
लक्षणे
1) सुरवातीस नवीन पानावर, गोल किंवा आकारविरहित ठिपके दिसतात. त्याला वलय असते.
2) मधला भाग भुरकट रंगाचा दिसतो. नंतर मधला भाग गळून पडतो.
3) बऱ्याचदा असे ठिपके पानाच्या देठांवर किंवा खोडावरसुद्धा आढळतात.
एकात्मिक रोग व्यवस्थापन
1) शेतातील रोगग्रस्त अवशेषांचा नायनाट करावा. उन्हाळ्यात खोल नांगरणी करावी.
2) बियाण्यास 1 ग्रॅम कार्बोक्झीन अधिक 3 ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्यास प्रक्रिया करावी.
3) रोगग्रस्त पिकावर 25 ग्रॅम मॅन्कोझेब किंवा 10 ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
6)मूळकूज/ खोडकूज
रोगकारक बुरशी - रायझोक्टेनिया सोलनाय, रायझोक्टोनिया बटाटीकोला.rayzon teniya solnach
rhizoctonia bataticola
लक्षणे
1) झाड एकाएकी पिवळे पडून वाळते, सहजासहजी उपटले जाते.
2) झाडाची मुळे कुजून त्याची साल निघते.
3) मुळाचा खालचा भाग प्रथम पिवळसर व नंतर काळपट पडतो.
4) झाडाची मुळे हाताला ओलसर व चिकट लागतात.
एकात्मिक रोग व्यवस्थापन
1) चांगला पाऊस पडल्यावरच पेरणी करावी.
2) रोगाचे प्रमाण जास्त असल्यास 10 ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा 25 ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराइड प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.
7)आकस्मिक मर (पॅराविल्ट) Parawilt
लक्षणे
1) सुरवातीस झाडातील तजेला नाहीसा होणे, झाड एकाएकी मलूल होते, पिवळे पडणे.
2) पात्या, फुले, तसेच अपरिपक्व बोंडे सुकतात, गळतात. शेवटी झाड सुकते.
एकात्मिक व्यवस्थापन
1) जमिनीत पाण्याचा योग्य निचरा होण्यास योग्य वेळी डवरणीच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत ठेवावी.
2) पिकास पाण्याचा ताण जास्त कालावधीकरिता बसू देऊ नये. तसेच शेतात झाडाजवळ दीर्घ काळ पाणी तुंबून राहणार नाही, याची काळजी घ्यावी.
3) रोगग्रस्त झाडाच्या भोवतालची जमीन खुरपीने त्वरित भुसभुशीत करावी आणि प्रति झाड 2 ते 3 ग्रॅम युरिया झाडाजवळ जमिनीत मिसळून द्यावा.
4) झाडाच्या मुळ्यांजवळ कॉपर ऑक्झिक्लोराइड 30 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून या द्रावणाची झाडांच्या बुंध्याजवळ आळवणी करावी.
एकात्मिक रोग व्यवस्थापनाच्या महत्त्वाच्या बाबी
1) शेत आणि शेत परिसरात स्वच्छता ठेवावी.
2) पिकाची योग्य फेरपालट करावी.
3) रोगमुक्त, प्रतिकारक जातींची लागवड करावी.
4) दोन ओळींत व झाडांत शिफारशीत अंतर ठेवून पेरणी करावी.
5) माती परीक्षणानुसारच रासायनिक खताची मात्रा द्यावी.
6) योग्य वेळी आंतरमशागत करावी.
7) शेतातील रोगग्रस्त झाडे, रोगग्रस्त अवशेष नष्ट करावेत.
8)कॉटन लीफ कर्ल व्हायरस (विषाणू)cotton leaf curl virus
रोगाचा प्रसार अथवा वाहक कीटक- पांढरी माशी
लक्षणे
1) पानांच्या शिरा तुलनात्मकरीत्या गर्द हिरव्या होतात.
2) पानांच्या मागच्या बाजूस जाड भाग निर्माण होतो, झाडाची वाढ खुंटते.
3) पात्या, फुले कमी येतात, पाने द्रोणासारखी होतात.
एकात्मिक रोग नियंत्रण व्यवस्थापन
1) रोगग्रस्त झाडे त्वरित उपटून जाळून नष्ट करावी.
2) सिंथेटिक पायरेथ्रॉईड्स गटातील (उदा.- सायपरमेथ्रीन) कीटकनाशकांचा वापर टाळावा.
3) पांढऱ्या माशीला बळी पडणाऱ्या पिकांचा कपाशीमध्ये आंतर किंवा मिश्र पीक म्हणून लागवड करू नये.
4) नत्रयुक्त खतांचा अवास्तव वापर टाळावा.
5) भेंडी पिकावर हा रोग येत असल्याने या पिकाची लागवड कपाशीच्या क्षेत्राजवळ करणे टाळावे.
6) पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी शिफारस केलेल्या आंतरप्रवाही कीटकनाशकाची फवारणी करावी.
कवडी
9)रोगकारक बुरशी - कोलेटोट्रायकम गॉसीपाय
लक्षणे
1) पानांवर, पानांच्या टोकांजवळ, तसेच पानांच्या कडेला दाट तपकिरी रंगाचे 5-10 मि.मी. व्यासाचे चट्टे पडतात.
2) बोंडावर लालसर तपकिरी, काळपट, खोलगट चट्टे पडतात. अशी बोंडे उमलत नाहीत.
3) बोंडातील कापूस चिकटून तो कवडीसारखा दिसतो.
एकात्मिक रोग व्यवस्थापन
1) पिकाची फेरपालट करावी. तंतुविरहित केलेले बियाणे वापरावे.
2) कार्बोक्झीन 1 ग्रॅम अधिक थायरम 3 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
3) रोगट बोंडे जमा करून त्यांचा नायनाट करावा.
4) कॉपर ऑक्झिक्लोराइड 25 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून रोगग्रस्त पिकावर फवारणी करावी.
मर
10)रोगकारक बुरशी - फ्युजेरियम ऑक्झिस्पोरम फॉ. स्पे. व्हेसीनफेक्टम fusarium oxysporum f. sp. vasinfectum
लक्षणे -
1) रोगग्रस्त पाने प्रथम मलूल होऊन पिवळी होऊन गळून पडतात.
2) झाडाच्या काही फांद्या अथवा पूर्ण झाड वाळते.
3) रोगग्रस्त झाडाचे सोटमूळ उभे चिरल्यास आतील भागात काळसर तपकिरी रंगाची रेषा आढळते.
एकात्मिक रोग व्यवस्थापन
1) रोगप्रतिबंधक जातींची लागवड करावी.
2) तंतुविरहित व बीजप्रक्रिया केलेले बियाणे पेरणीकरिता वापरावे.
3) कार्बोक्झीन 1 ग्रॅम अधिक थायरम 3 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करून घ्यावी. सावलीत बियाणे वाळवावे. त्यानंतर ट्रायकोडर्मा 4 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
4) रोगग्रस्त झाडे उपटून त्यांचा नायनाट करावा.
*टीप:- सांगितलेले सारखे घटक असलेले कोणते पण औषध तुम्ही वापरू शकता.