निंबोळी अर्क घरी कसे बनवायचे? How make nimboli ark at homez5% निंबोळी अर्क घरी कसे तयार करावे?
रसायनाचा अतिवापरामुळे खूप जास्त होत आहे. त्यापासून सजीवसृष्टीला धोका निर्माण होत आहे.रसायनाच्या अतिवापरामुळे पर्यावरणावर दुष्परिणाम होत आहेत. हे होणारे दुष्परिणाम थांबविता येतात. त्यासाठी आपल्याला निसर्गातील गोष्टीचा वापर करुन पर्याय निर्माण करणे गरजेचे आहे. त्यापैकीच एक म्हणजे निंबोली अर्क होय. एकात्मिक किडरोग
व्यवस्थापन करण्यासाठी nimboli ark वापरले जाते. पिकांतील किडींचे नियंत्रण करण्यासाठी महागडी कीटकनाशके विकत घेण्यापेक्षा घरी तयार होत असलेले nimboli ark शेतकऱ्यांसाठी कधीपण अतिशय फायदेमंद राहील.nimboli ark हे किडांचे नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यासाठी अतिशय उपयुक्त घरी बनविता येते असलेले आणि पिकाला कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नसलेले औषध आहे. निंबोळी अर्क त्यारकरण्याची पद्धत अतिशय सोपी आणि साधी आहे. शेतकऱ्याला व्यवस्थित माहिती असेल तर खूपच साध्या पद्धतीने निंबोळी अर्क बनविता येते. निंबोळी अर्कचा वापर करुन अनेक प्रकारच्या किडांवर नियंत्रण मिळविता येते.
निंबोळी अर्क घरी कसे बनवायचे?
Nimboli ark ghar par kaise banaye in marathi?
Nimboli ark ghari kase banvayche ?
5% निंबोळी अर्क घरी कसे तयार करावे?
निंबोळी अर्क हा कडुनिंबाच्या फळापासून बनत असतो. त्या फळाला निंबोळी म्हणतात. nimboli ark बनविण्यासाठी कडुनिंबाच्या झाडाखाली पडलेल्या निंबोळ्या गोळा करा. या सर्व निंबोळ्या खूप चांगल्या पिकलेल्या असणे आवश्यक आहे.निंबोळ्या चांगल्या पिकलेल्या असल्या तर आपले nimboli ark खूप चांगले आणि जास्त परिणामकारक बनते म्हणून निंबोळी पिकलेल्या असणे गरजेचे आहे.
गोळा केलेल्या निंबोळ्याची साल वेगळी आणि बिया वेगळ्या करा. वेगळ्या केलेल्या बियांचा गर स्वच्छ प्रकारे धुवून काढा. गरात साखरेचे प्रमाण जास्त असते म्हणुन त्यावर बुरशी वाढण्याची शक्यता असते. आता या साल आणि गर काढलेल्या निंबोळीच्या बिया चांगल्या सुकून घ्या. आणि या सर्व बिया कोरड्या जागी साठवून घ्या. या बियांना पाणी किंवा ओलावा असलेल्या जागेत ठेऊ नये करण पुढे या बिया बारीक कराव्या लागणार आहेत आणि ओल्या झालेल्या बिया चांगल्या प्रकारे बारीक होऊ शकत नाहीत. म्हणून या बिया कोरड्या जागेत ठेवणे खूप गरजेचं आहे. आणि बिया चांगल्या प्रकारे कोरड्या असणे आवश्यक आहे.
आतापर्यंत आपण nimboli ark बनविण्याची बेसिक प्रक्रिया पूर्ण केली आहे. आता चांगल्या सुकलेल्या त्या सर्व निंबोळीच्या बिया घेऊन खलबत्याच्या मदतीने चांगल्या बारीक करुन घ्या. जर निंबोळी अर्क जास्त प्रमाणात बनवायचे असेल तर निंबोळीच्या बियापण जास्त असतात. अश्यावेळी निंबोळीच्या बिया खलबत्यात बारीक करणे खूप अवघड होते तेंव्हा आपण पल्वरायझरच्या मदतीने पण बिया बारीक करु शकतो. फवारणी करण्याच्या एक दिवस आधी सायंकाळी पाच किलो हे बारीक केलेले निंबोळीच्या बियांचे पावडर नऊ लिटर पाण्यात भिजण्यासाठी टाका. आणि एक लिटर पाण्यात 200 ग्राम साबणाचा चुरा वेगळा भिजत टाका.
आता रात्रभर या पाण्यात निंबोळीच्या बियांचे पावडर पाण्यात राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी हे सर्व अर्क स्वच्छ कपड्यातून चांगल्या प्रकारे गाळून घ्या. हे निंबोळीच्या बियांचे अर्क चांगल्या प्रकारे गाळून घेणे खूप गरजेचे आहे नाहीतर आपल्याला स्प्रे करताना अडचणी येतील. आता या गाळून घेतलेल्या अर्कामध्ये आपण बाजूला भिजवण्यास ठेवलेले एक लिटर साबणाचे द्रावण मिसळा. हे सर्व द्रावण चांगल्या प्रकारे मिसळून घ्या आणि हे सर्व द्रावण दहा लिटर होईपर्यंत पाणी टाका. आता हा आपला जवळ जवळ nimboli ark तयार झाला आहे.
आता हे सर्व द्रावण आपल्याकडे 10 लिटर असेल. आता एका वेगळ्या टाकीमध्ये 90 लिटर पाणी घ्या आणि त्या टाकीमध्ये आपले 10 लिटर असलेले निंबोळीच्या बियांचे अर्क आणि साबणाचे द्रावण मिसळून टाका. आता हे सर्व द्रावण एकमेकामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होईपर्यंत ढवळा. अशा प्रकारे आपले 5% निंबोळी अर्क तयार झाला असेल. कसलाही खर्च न करता किडींच्या नियंत्रणासाठी आपण अतीशय उत्तम प्रकारचे निंबोळी अर्क तयार केलेले आहे. यासाठी कोणतीच अशी विशेष मेहनत नाही आणि ही पद्धत पण अतिशय सोपी आहे. हे 5% nimboli ark 500 ते 1000 मी. ली. पाण्यात मिसळून फवारणी करावी.
निंबोळी अर्क तयार करतांना कधीपण फवारणी करण्याच्या एक दिवस आधी तयार करावे. निंबोळी अर्क एक दिवस आधी तयार केले तर त्याची गुणवत्ता चांगलीं असते. आणि या निंबोळी अर्काचे रिझल्ट पण खूप चांगले येतात. यामध्ये कडूपणा थोडा जास्त असतो. हाच कडूपणा किडे आणि आळ्या यांना आपल्या कोणत्याही पिकांवर परत येण्यापासून रोखत असतात. निंबोळी अर्क बनवीत असताना घ्यावयाची काळजी म्हणजे सुरुवातीला चांगल्या पिकलेल्या निंबोळ्या वापराव्यात कारण चांगल्या पिकलेल्या निंबोळ्या पासून बनलेले निंबोळी अर्क अतिशय चांगले आणि उत्तम दर्जाचे असते. आणि दुसरी काळजी म्हणजे द्रावण चांगलें गाळून घ्यावे कारण द्रावण चांगलें असल्यास ते पाण्यात खूप चांगल्या प्रकारे मिसळले जाते. आणि आपले निंबोळी अर्क अतिशय परिणाकारक बनले जाते. आणि तिसरी काळजी म्हणजे निंबोळी अर्क नेहमी फवारणी करण्याच्या एक दिवस आधी बनवावे.
निंबोळी अर्काचे फायदे.
Nimboli ark वापरण्याचे फायदे शेतकऱ्याला अतिशय आहेत. निंबोळी अर्कच्या वापरामुळे कोणत्याही प्रकारच्या किटांचे नियंत्रण करता येते. मावा, कापसावर होणाऱ्या अमेरिकन बोंडआळ्या, खोकडा रोगाला कारणीभूत असणारे तुडतुडे, पाने पोखरणारी अळी, देठ कुरतडणारी अळी, पाने कुरतडणारी अळी, फळमाशा, खोडकिडा अश्या प्रकारच्या अनेक किडांवर निंबोळी अर्काचा परिमाण पडतो. या सर्व किडी पासून पिकांचे संरक्षण निंबोळी अर्काचा वापर करुन करता येते. निंबोळी अर्काचा वापर करुन रसशोषण करणाऱ्या किड्यांचा पण प्रादूर्भाव कमी करता येते. निंबोळी अर्क पिकांवर कोणत्याही प्रकारचे किडे येऊ देत नाहीत. नाही यामध्ये असलेल्या कडू पणामुळे देखील जनावरे किंवा हरण या पासून आपल्या पिकांचे संरक्षण होते.
शेतकऱ्यासाठी शेती फायदेशीर करण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न घेणे हाच आहे. म्हणून त्यासाठी निंबोळी अर्क सारखे पर्याय वापरणे खूप गरजेचे आहे. पिकातील किडींच्या नियंत्रणासाठी महागडी रासायनिक कीटकनाशके बाजारातून खरेदी करण्यापेक्षा निसर्गात उपलब्ध असलेल्या निंबोळीच्या वापरातून अगदी अल्प खर्चात घरच्याघरी प्रभावी निंबोळी अर्क हे नैसर्गिक किटकनाशक तयार करावे. याचा प्रत्येक शेतकऱ्याने वापार अवश्य करावा आणी रासायनिक कीटनाशकांमुळे दुष्परिणाम टाळून आपला खर्च देखील कमी करावा.